बॅक्टीरियांचे वंशज
एक जीवजात म्हणून पाहता आपण अजूनही स्वतःबद्दलच्या धारणांमध्ये जे विक्षिप्त वाटते त्याला घाबरतो. डार्विन होऊन गेल्यावरही किंवा डार्विनमुळेही, एक संस्कृती म्हणून आपल्याला आजही उत्क्रांतीमागचे विज्ञान समजत नाही. विज्ञान आणि संस्कृति यांच्यात संघर्ष झाला तर नेहमीच संस्कृतीचा विजय होतो. (पण) उत्क्रांतीच्या शास्त्रांची जास्त समजून घेण्याची पात्रता आहे – हो, माणसे उत्क्रांत झाली आहेत, पण कपी किंवा …